Pune : ‘स्वराधीन’ ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे पुण्यात 89 व्या वर्षी निधन

पुणे : Pune | महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्याकडून स्वराधीन अशी पदवी मिळालेले, ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग Famous Violinist Prabhakar Jog (वय ८९) यांचे आज सकाळी ८ वाजता राहत्या घरी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गाणारं व्हायोलिन म्हणून त्यांचे कार्यक्रम गाजले (Pune) आहेत.

मुळचे नागपूरचे असलेले प्रभाकर जोग हे स. प. महाविद्यालयात (Pune) शिकत असताना कॉलेजच्या स्नेहसंमेलनात त्यांचा व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम होता. त्याला संगीतकार सुधीर फडके हे उपस्थित होते. त्यांचे व्हायोलिनवादन ऐकून फडके यांनी त्यांना आपल्याबरोबर चित्रपटगीतांच्या साथीसाठी घेतले. माडगुळकर, फडके जोडींचे गीत रामायण देशभर गाजले.  त्यात व्हायोलिन वादक म्हणून प्रभाकर जोग यांनी आपली भूमिका निभावली होती. तसेच सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या कार्यक्रमांमध्येही ते त्यांची साथ करीत असत.
ऊन पाऊस या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम सहायक संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.
त्यानंतर स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी २३ मराठी चित्रपटांना संगीत दिले.
जावई माझाा भला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीचं वाण, दाम करी काम, चुडा तुझा सावित्रीचा, कैवारी,
चांदणे शिंपीत जा, आंधळा मारतोय डोळा अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

प्रभाकर जोग (Famous Violinist Prabhakar Jog) यांना लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

हे देखील वाचा

सावधान ! जर तुम्ही सुद्धा विकत असाल Old Coin किंवा Note तर जाणून घ्या ‘ही’ मोठी बाब, RBI ने जारी केली महत्वाची सूचना

Atal Pension Yojana मध्ये ऑनलाइन उघडू शकता खाते, PFRDA ने सुरू केली नवी सर्व्हिस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune : famous violinist prabhakar jog passed away in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update