pune : पत्ता विचारण्याचा बहाणा करून लूटमार करणार्‍याला फरासखाना पोलिसांनी पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पत्ता विचारण्याच्या बहणाकरून लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अस्लम इस्माईल शेख (रा. गाडीतळ, हडपसर) व राहुल उमाजी खोमणे (वय 24, रा. कोरोळा, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शहरात लुटमरीच्या घटना घडत आहेत. विशेषतः मध्यवस्तीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल व पैसे काढून घेतले जात होते. तर कधी हातचलकीने पैसे पळविले जात. दरम्यान तीन दिवसांपूर्वी भर दुपारी आंबेगाव पठार येथील अण्णासाहेब पाटील यांना बुधवार पेठेतील तापकीर गल्लीत दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले. पण अचानक त्यांच्या पाया पडत हातचलकीने खिशातील 23 हजार 500 रुपये चोरून नेले होते.

याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती करत असताना कर्मचारी वाल्मिकी यांना हा गुन्हा अस्लम शेख याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, कर्मचारी यशपाल वाल्मिकी, सचिन सरपाले व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

चौकशीत त्याने हा गुन्हा साथीदार राहुल याच्या साथीने केल्याचे सांगितले. त्यानुसार राहुल याला देखील पकडण्यात आले. दरम्यान अस्लम शेख हा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. अधिक तपास पोलीस हवालदार किरण कदम हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like