Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Farmer Suicide | मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष सोपान जाधव (वय ५०, रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी या शेतकऱ्याचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश याने प्रसारमाध्यमासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. न्याय मिळवण्यासाठी माझे वडील मंत्रालयासमोर गेले होते. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या (Pune Farmer Suicide) केली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली गुन्हे दाखल झाले पण आता माझे वडील येतील का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

गणेश जाधव म्हणाले की, माझे सर्व कुटुंब सावकार व पोलिसांच्या अन्यायामुळे त्रस्त झाले होते. गेली वर्षभर अन्याय सहन केला. मंचर पोलिस, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, विशेष महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी व मंत्रालयात न्याय मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला. भेटी घेतल्या. पण, न्याय मिळाला नाही.

दरम्यान, गणेश जाधव यांनी मुंबई येथील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केले आहे की, विलास सहादु शिंदे याने ठरल्याप्रमाणे १७ गुंठे जमिनीचे खरेदीखत करताना माझ्या वडिलांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर असलेल्या एकूण २८ गुंठे जमिनीचे खरेदीखत स्वतःच्या नावावर करून घेतले. ठरल्याप्रमाणे जमीन व्यवहार पूर्ण न करता कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम आम्हाला दिली नाही. उलट सुभाष जाधव यांच्या नावे असणारी एक एक्कर जमीनीचे खरेदीखत सुशीला सुरेश जाधव यांच्या नावे करून घेवुन फसवणूक केली आहे. २८ गुंठे जमिनीचा ताबा मिळण्याकरिता तगादा लावून सुभाष जाधव यांना व कुटुंबीयांना मानसिक, शारीरिक त्रास दिला. संबंधितांच्या त्रासाला कंटाळून वडील सुभाष जाधव यांनी आत्महत्या केली. असे जबाबात म्हंटले आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या (व्हिडीओ)

Modi Government | देशाची 60 ‘खरब’ची (Trillion) मालमत्ता विकणार मोदी सरकार; प्लान समोर ठेवून सितारमन म्हणाल्या – ‘मालक सरकारच असणार’

आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Murder of wife in Pune on suspicion of immoral relationship, commotion in the area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update