Pune Fashion Street Firing Case | पथारी संघटनेच्या अध्यक्षावर गोळीबार करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fashion Street Firing Case | पुण्यातील एमजी रोड पथारी असोसिएशनच्या अध्यक्षावर (MG Road Pathari Association) पूर्व वैमनस्यातून छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार (Firing) केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करुन फरार झालेल्या दोन आरोपींना लष्कर पोलिसांनी (Lashkar Police Station) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले असता 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Pune Fashion Street Firing Case)

 

नमीया उर्फ शानू सलीम शेख Namia alias Shanu Salim Sheikh (वय – 38 रा. भिमपुरा, कॅम्प) आणि तरबेज अब्दुल रशिद कुरेशी Tarbej Abdul Rashid Qureshi (वय – 46 रा. कुरेशी मस्जिद जवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी जुल्फिकार शेख (Zulfiqar Sheikh) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेत तौफिक अख्तर शेख Tawfiq Akhtar Sheikh (वय – 45 रा. भीमपुरा कॅम्प, पुणे) यांना एक छर्रा लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तौफिक शेख हे एम.जी. रोड पथारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आणि संशयित आरोपी जुल्फिकार शेख याच्यासोबत वाद होते. याच वादातून जुल्फिकार याने अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मदतीने तौफिक यांना धमकावत होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रिट परिसरातील (Pune Fashion Street Firing Case) एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आले असता त्यांच्यावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. यामध्ये एक छर्रा तौफिक यांना लागला आहे. त्यांच्यावर खुनी हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले होते. पोलिसांनी (Pune Police) आरोपीचा शोध घेऊन आठ तासात बेड्या ठोकल्या.

 

 

Web Title :- Pune Fashion Street Firing Case | goons involved in fashion street firing arrested by pune lashkar police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा