Pune News : महिला सरपंचासह कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सरपंचपदी निवड झाल्यानंतर पराभूत उमेदवाराकडून नवनिर्वाचित महिला सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.

खेड तालुक्यातील मोहकल गावात ही घटना घडली. या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अश्विनी मारुती भागवत असे मारहाण झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आश्विनी भागवत यांची सरपंचपदी निवड झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून ईश्वर महादेव रणपिसे याने घरात घुसून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील वस्तूंची तोडफोड केली. तेंव्हा माझे पती घरी नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांनी घरी येत माझ्या पतीची कॉलर पकडत त्यांना धमकावले आणि मारहाण केली, असा आरोप अश्विनी भागवत यांनी केला आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.