‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत आहे. दिनांक १३ ते २३ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कालावधीत संपन्न होणार्‍या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी साडेचार वाजता ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्याचे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b27c1b48-b502-11e8-b423-3b62253e6f27′]

विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणार्‍या व्यक्तींना उद्घाटन सोहळ्यात ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरवले जाणार आहे. यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना या सन्मानाने गौरवले जाणार आहे. तसेच पुण्यातील शताब्दी साजरी करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा देखील या उद्घाटन सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. यंदा साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर (गणेशोत्सव मंडळ) यांचा यंदा गौरव केला जाणार आहे.

पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने होणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदना सादर करतील. यानंतर महाराष्ट्र मंडळाची १५ मुले व मुली आकर्षक योगा प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. पल्लवी कव्हाणे त्यांच्या प्रशिक्षक आहेत. महाराष्ट्र मंडळाचे धनंजय दामले यांनी याचे संयोजन केले आहे. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम भाग्यश्री अभ्यंकर, सोनाली नांदुरकर, ऋषिकेश बडवे आणि हेमंत वाळूंजकर सादर करतील. याला पराग माटेगावकर (हार्मोनियम) आणि राजेंद्र हसबनीस (तबला) यांची वाद्यसंगत असेल. प्रकाश भोंडे यांनी याचे संयोजन केले आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B072FJPFTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b7d5bcf6-b502-11e8-828b-3dc3c3aea1f5′]

स्त्री शक्तीचा जागर असणारे 18 महिला कलावंतांनी विशिष्ट पेहेरावात सादर केलेले ’पोवाडा फ्युजन’ हे उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण असेल. राजनीश कलावंत यांची संकल्पना, संहिता व संगीत असणार्‍या पोवाडा फ्युजनचे नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफर तेजश्री अडिगे यांनी केले आहे. सुप्रिया ताम्हाणे याच्या समन्वयक आहेत. ‘फेस्टिवल्स ऑफ इंडिया’ हा होळी नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, गुजराती गरबा नृत्य, महाराष्ट्राचे कोळी नृत्य व नारळी पौर्णिमा यांचा समावेश असलेला नृत्याविष्कार गाण्यांसह सादर केला जाणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण, नृत्यदिग्दर्शक कुणाल फडके व शिल्पा जोशी यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले असून त्यांच्या ’डान्स मंत्रा ग्रुप’च्या 11 मुले व 11 मुली आणि ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या 7 मुली याचे सादरीकरण करणार आहेत. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ’ट्रीब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंडस्’ हा विशेष नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर होणार असून त्यामध्ये नृत्यांगना अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रिया मराठे, चेतन चावडा आणि मयुरेश पेम पुणे फेस्टिव्हलच्या सुमारे 25 कलावंतांसह नृत्याविष्कार सादर करतील. या कार्यक्रमाची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन कोरिओग्राफार तेजश्री अडिगे यांनी केले आहे.

या उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 8.30 वाजता सुफी संगीत दरबार (कव्वाली) हा बहारदार कार्यक्रम सादर होणार असून महाराष्ट्र कॉस्मो पॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार व डेक्कन मायनॉरिटी लायब्ररीच्या अध्यक्षा आबिदा इनामदार यांनी याचे संयोजन केले आहे. यामध्ये पवन श्रीकांत नाईक (प्रमुख गायक), कल्याण मुरकुटे (हार्मोनियम व गायन), नरसिंग देसाई व पंकज नाईक (हार्मोनियम), स्मिता राणा (सतार), कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला, जेंबे), गोपीनाथ वर्पे (पखवाज), विश्वजीत कुलकर्णी (तबला) व कोरसला विजय जाधव, डॉ. रिझवान शेख, नवरत्न वर्मा, संकेत गांधी, अविनाश तिजोरे, हरीश कुटे, पवन तळेकर, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, राधिका परदेशी, मुलांशू परदेशी, श्रेयस क्षित्रे, हे राष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी होत आहेत. एकूण 22 कलावंतांसह सादर होणार्‍या या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन वीणा दिघे करणार आहेत.
[amazon_link asins=’B005FYNT3G,B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfd6886d-b502-11e8-b10e-3dce52060246′]

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे फेस्टिव्हलचे अन्य मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये शनिवार दि. 15 रोजी दुपारी 3 वाजता ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, रात्री 8.30 वाजता प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक व सहकारी यांनी सादर केलेला. ‘गोल्डन इरा ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम, दि. 16 रोजी अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन व दि. 17 रोजी प्रख्यात गायिका राणी वर्मा यांचा ‘जश्न-ए-हुस्न’ हे कार्यक्रम सादर होतील.

शनिवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता होणार्‍या ’मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेसाठी 18 ते 25 वयोगटातील स्पर्धेत सहभागी झालेल्या 100 युवतींपैकी 20 युवतींची निवड करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत खिंन-ख्वाब ही बनारसी ड्रेस थीम त्यासाठी असेल. त्यातून 10 युवतींची निवड केली जाईल. दुसर्‍या फेरीसाठी ‘हवायन’ थीम असणार आहे. त्यातील 3 जणींची अंतिम फेरीत निवड होऊन बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, सर्वसाधारण ज्ञान, व्यक्तीमत्व आणि सौंदर्य या आधारे परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरानुसार प्रथम 3 क्रमांक निवडले जातील. प्रथम क्रमांकास ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ किताबाने गौरवले जाईल. तसेच बेस्ट हेअर, बेस्ट स्माईल, बेस्ट फिटनेस मॉडेल, मिस फोटोजेनिक आणि मिस फेवरेट यांची निवड केली जाईल. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन जुगल चंदन यांनी केले आहे. सुप्रिया ताम्हाणे या समन्वयक म्हणून काम करत असून जुई सुहास या शो डिरेक्टर, फॅशन कोरिओग्राफी व ग्रूमिंग मेंटॉर म्हणून काम बघत आहेत.
[amazon_link asins=’B071W6FQPL,B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8051b81-b502-11e8-832c-8dbab9e1192a’]

याचदिवशी रात्री 8.30 वाजता प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक व सहकलावंतांचा ’गोल्डन इरा ऑफ म्युझिक’ हा कार्यक्रम सादर होईल.जेष्ठ संगीतकार सी.रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली, स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भव्य वाद्यवृंदासह हिंदी मराठी गाण्यांचा ‘सुहानासफर’ कार्यक्रम ते सादर करतील.
रविवार दि. 16 रोजी रात्री 8.30 वाजता अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन संपन्न होणार असून त्यामध्ये सुभाष काब्रा, महेश दुबे, नवनीत हुल्लड, राजेंद्र मालवीय, सायरा राणा तबस्सुम, सुमिता पेशवा हे नामवंत हिंदी कवी सहभागी होत आहेत. याचे संयोजन प्रख्यात कवी सुभाष काब्रा यांनी केले असून या कवी संमेलनाचे ते सूत्रसंचालन करतील.

सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता प्रख्यात कवी व दिग्दर्शक अमर वर्मा व ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या गायिका राणी वर्मा यांचा ‘जश्न-ए-हुस्न’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यामध्ये हिंदी चित्रपट गीतांमधून व्यक्त झालेल्या स्त्री सौंदर्याची महती नृत्य व गाणी या आधारे विषद केली असून ‘चौदवी का चाँद’, ‘चन्दन सा बदन’, ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, ‘भोली सूरत’, ‘पिया ऐसो जिया में’, ‘परदे में रहने दो’ अशा स्त्री सौंदर्याशी निगडीत, जुन्या रेट्रो लोकप्रिय निवडक हिंदी चित्रपट गीतांचा कौशल्याने वापर केला आहे.

पुणे फेस्टिव्हलचे अन्य सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होतील. या सर्व कार्यक्रमांचे मोहन टिल्लू हे समन्वयक आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता भोपाळच्या नृत्यांगना व्ही. अनुराधा सिंह यांचा बंदिश हा कथ्थक नृत्याविष्कार सादर होईल. सायंकाळी 6.30 वाजता ‘शिवतांडव’ हा कथ्थक नृत्य बॅले सुकृती कथ्थक डान्स अकादमीचे कलावंत सादर करतील. याच दिवशी रात्री 9.30 वाजता ‘इप्टा पुणे प्रस्तुत’ प्रदीप तुंगारे लिखित व रवींद्र देवधर दिग्दर्शित राज्यनाट्य स्पर्धेतील पुरस्कार विजेते मराठी नाटक ‘शनिवार वाडा विकणे आहे’ हे सादर होईल. बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा ‘सुरवंदना’ हा कार्यक्रम सादर होईल.
[amazon_link asins=’B077RV8CCZ,B077RV8CCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3c4011c-b502-11e8-b45b-515b60f5061e’]

गुरुवार दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘देवी पार्वती’ हा कथ्थक नृत्याविष्कार डॉ. शशिकला रवि सादर करतील. सायं. 6.30 वाजता ‘अर्ध नारेश्वर’ हा कथ्थक बॅले नुप्रा डान्स अकादमीचे कलावंत सादर करतील. याच दिवशी रात्री 9.30 वाजता पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या एकांकिका सादर होतील. शुक्रवार दि. 21 रोजी सायं. 5 वाजता हसायदान फाउंडेशनतर्फे ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ हा मराठी नामवंत एकपात्री कलाकारांचा कार्यक्रम सादर होईल. याचे संयोजन व सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले आहे. यामध्ये बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैत्राली माजगावकर-भंडारी, श्रीनिवास सप्रे इ. कलावंत सहभागी होतील. प्रख्यात एकपात्री कलावंत बंडा जोशी यांचे 5000 जाहीर कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव याप्रसंगी केला जाणार आहे.

शनिवार दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील बंगाली असोसिएशनतर्फे नृत्य, नाटक व संगीत यावर आधारित ‘बंगाल महोत्सव’ सादर होईल. यामध्ये पारंपारिक बंगाली लोककलांबरोबरच 2 वर्षांपासून 78 वर्षांपर्यंतच्या सुमारे 50 ते 60 कलाकारांनी सादर केलेली ‘दुर्गा पूजा’ सादर केली जाणार आहे. पुण्यातील बंगाली असोसिएशनचे समररॉय चौधरी आणि मिहिर दत्ता याचे समन्वयक आहेत. याच दिवशी रात्री 9.30 वाजता सदाबहार ‘मराठी कवी संमेलन’ सादर होईल. जेष्ठ वात्र-टिकाकार रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यामध्ये अरुण म्हात्रे, महेश केळूसकर, साहेबराव ठाणगे, प्रशांत मोरे, सुरेश शिंदे, अंजली कुलकर्णी, सुदेश लोटलीकर, रमणी सोनावणे, बी.के. शेख, अनिल दीक्षित हे महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री सहभागी होत आहेत.
[amazon_link asins=’B07D11MDBS,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a081556c-b503-11e8-8858-a748e8401332′]

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट सृष्टीचे अजरामर संगीतकार सी. रामचंद्र, नौशाद, जयदेव आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जेष्ठ चित्रपट समीक्षक सुलभा तेरणीकर, वंदना कुलकर्णी व उस्मान शेख यांनी तयार केलेला विशेष दृकश्राव्य कार्यक्रम सादर होईल. बुधवार दि. 19 रोजी सायं. 5 वाजता गोव्याचे डॉ. लक्ष्मीकांत सहकारी हे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन सादर करतील. सायं. 6.30 वाजता मानसी मिलिंद कुलकर्णी यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारीत ‘प्रतिभा संगम’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 22 रोजी सायं 5 वाजता संपन्न होईल. सुवर्णा माटेगावकर, सावणी दातार, चैतन्य कुलकर्णी आणि मंदार आपटे हे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार असून याची संहितालेखन व निवेदन अरूण नूलकर यांचे आहे. पराग माटेगावकर यांनी संगीत संयोजन केले असून स्वरानंद प्रतिष्ठान तर्फे प्रकाश भोंडे यांनी याचे आयोजन केले आहे.
[amazon_link asins=’B01951R2S2,B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9fc4208-b502-11e8-b4f7-8fa28fffc698′]

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘वॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हडपसर येथे ससाणे नगर, चिंचवड येथे पिरॅमिड हॉल व पद्मावती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह अशा तीन ठिकाणी प्राथमिक फेरीत पार पडली. त्यामध्ये सुमारे 300 गायक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातून अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरूवार दि. 20 रोजी सायं. 5 वाजता प्रख्यात गायिका सावनी शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडेल. या स्पर्धेत पुरूष व महिला यांचे 15 ते 40 वर्ष व 40 वर्षापुढील असे एकूण चार गट आहेत. त्यातील प्रत्येक गटात पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिक दिले जाईल. अनुराधा भारती याच्या समन्वयक आहेत.

उगवत्या व नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनु’ हे विशेष कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित होतात. 7 ते 14 वर्षे वयोगटातील बालकलाकारांसाठी ‘उगवते तारे’ आणि 15 ते 25 वर्ष वयोगटातील युवा कलाकारांसाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रम आयोजित होतो. यंदा ‘उगवते तारे’ मध्ये 300 व ‘इंद्रधनू’ मध्ये 100 युवा कलावंत सहभागी होत आहेत. ‘उगवते तारे’ तीन भागात होणार असून बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 15 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘उगवते तारे भाग 1’ आणि सायं. 5 वाजता ‘उगवते तारे भाग 2’ संपन्न होईल. ‘उगवते तारे भाग 3’ दि. 16 रोजी दुपारी 12.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होईल. याच दिवशी येथे सायंकाळी 5 वाजता ‘इंद्रधनू’ कार्यक्रम सादर होईल. रविंद्र दुर्वे याचे संयोजक आहेत.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3a4f25b-b502-11e8-b646-51bb410b8857′]

दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि. 20 रोजी दुपारी 1 वाजता कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे ज्येष्ठ सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर हे ‘रेसीपी शो’ सादर करणार असून त्यात 3 तिखट व 1 गोड पदार्थांचे प्रात्यक्षिक ते दाखवतील. शनिवारी दि. 22 रोजी दुपारी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महिलांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 ते 35 वर्षे आणि 36 ते 50 अशा वयोगटात सोलो डान्स स्पर्धा आणि वय 20 ते 50 वर्षे या वयोगटात ग्रुप डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या तिन्ही वयोगटात प्रत्येकी पहिल्या तीन क्रमाकांना पारितोषिके दिली जातील. संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे संयोजन केले आहे.

पुणे फेस्टिव्हलचे प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जमनालाल बजाज फाउंडेशन, भारत फोर्ज, येस बँक, एनईसीसी, एलआयसी, पंचशील व कोहिनूर ग्रुप हे आहेत.सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष असून कृष्णकांत कुदळे मुख्य संयोजक आहेत.

पोलीसनामा न्युज
पुण्यातील ब्रेकिंग तसेच राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा…
https://t.me/policenamanews