Pune : पुणे महापालिकेचे बनावट गुंठेवारी नियमितीकरणाचे दाखले तयार करून पालिकेची आर्थिक फसवणूक; कोंढव्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेचे बनावट गुंठेवारी नियमितीकरणाचे दाखले तयार करून पालिकेची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा येथे हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी उप अभियंता कैलास कराळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नंबर 52/2ब/9 चे जमीनधारक दीपक किशोर चंदननवानी, कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 62/3ब/14 डी. एन. शर्मा व कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 46/14/11/4 बिलाल कुरेश, शदाब कुरेश, जब्बार शेख, जुबेर सौदागर, वाहिद सौदागर या जमीनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पालिकेत बांधकाम विकास विभाग झोन दोन येथे उप अभियंता आहेत. त्यांच्याकडे कोंढवा खुर्द नवीन हद्द, कोंढवा बुद्रुक व येवलेवाडी या विभागाचा देखील कार्यभार आहे. यादरम्यान कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नंबर 52/2ब/9 तर कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 62/3ब/14 आणि कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 46/14/11/4 या जमीन मालक असणाऱ्या व्यक्तींनी पालिकेची परवानगी नसताना त्यांनी पुणे महापालिकेचे बनावट गुंठेवारी नियमितीकरणाचे दाखले त्यार करून पालिकेची आर्थिक शुल्क बुडवून फसवणूक केली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.