वकील महिलेचा विनयभंग, इस्टेट एजंटवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  फ्लॅटच्या व्यवहारात मध्यस्थी करणार्‍याने पैसे न दिल्यावरून झालेल्या वादात इस्टेट एजंटने वकील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संतोष पंडीत (490, रा. सदाशिव पेठ, विश्रामबाग पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 50 वर्षीय वकील महिलेनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा वकीली व्यावसाय आहे. तर पंडीत हा इस्टेट एजंट आहे. फिर्यादी यांनी मागील वर्षी सदाशिव पेठेतील एक फ्लॅट खरेदी केला होता. त्या फ्लॅटच्या व्यवहारात पंडीत हा मध्यस्थ होता. त्याला 57 हजार 375 रूपये फिर्यादी यांनी धनादेशाने दिले होते. तरी तो फिर्यादींकडे गैरसमजाने आणखी 57 हजार 350 मागत होता. याच पैशासाठी त्याने फिर्यादी यांना निरनिराळ्या प्रकारे त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेच्या नावाचे शिल्लक राहिलेल्या पैशाबाबत बोर्ड बनविले व ते शनिपार चौकात लावले. तर त्याचे फोटो विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवले. त्याने महिलेचा पाठलाग केला आणि सनद घालविण्याची धमकी देऊन स्वतःच्या फेसबुक पेजवर महिले विषयी वाईट शब्दात लिहले. तसेच त्यांना अश्लिल भाषेत ईमेल पाठविला आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.