Pune : प्रसिद्ध गोयलगंगा डेव्हलपर्सचे संचालक अतुल गोयल यांच्यासह 200 ते 300 जणांविरुद्ध एका कुटुंबावर दगडफेक जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रसिद्ध असलेल्या गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक आणि 200 ते 300 जणांविरुद्ध एका कुटुंबावर दगडफेक करत जागेवर बॅरिकेट्स लावून ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी बायपास परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात आरिफ बेग (वय 47) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गोयलगंगा डेव्हलपर्सचे संचालक अतुल जयप्रकाश गोयल व कामगारांच्या वेशात आलेले 200 ते 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सोमवारी खराडी येथील सर्व्हे नंबर 22/2 येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यांची शेती असून ते शेतकरी आहेत. दरम्यान, खराडीत त्यांची वडिलोपार्जित जागा आहे. ती त्यांच्या सख्खे, चुलत भाऊ व चुलत्यांची आहे.

त्यांनी ही जागा त्यांनी डोम वेगवेगळ्या विकसन करारनामा करून 2006 साली गोयलगंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. ली. चे संचालक जयप्रकाश गोयल, अतुल जयप्रकाश गोयल व अमित जयप्रकाश गोयल यांना करून दिलेला आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करून देणे ठरले होते. पण, त्यांनी ठरल्यानुसार बांधकाम पूर्णकरून दिले नाही. तर तात्पुरती घरे राहण्यास दिले होते. त्यांनी काम पूर्ण न केल्याने याबाबत दिवाणी वाद सुरू आहेत. तर तात्पुत्या घराबाबत देखील न्यायालयात वाद होते. या दाव्याचा निकाल फिर्यादी यांच्या बाजूना लागला आहे. मात्र, त्यानंतर डेव्हलपर्सचे अतुल गोयल हे सतत गुंड लोक घेऊन दहशत निर्माण करत असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. तर दाव्यांचा निकाल लागेपर्यंत या जागेत यायचे नाही, असे म्हंटले आहे. पण, सोमवारी डेव्हलपर्स यांच्याकडून 200 ते 300 लोकांना त्यात महिला कामगार म्हणून पाठवत जाण्या- येण्याचा रस्ता तसेच घर यात अडथळा होईल असे करत बॅरिकेट्स लावले होते. तर काम करण्यास सुरुवात केली होती. याबाबत फिर्यादी यांनी विचारपूस केली असता त्यांना अतुल गोयल यांच्या सांगण्यावरून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याला फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला असता यातील काही लोकांनी शिवीगाळ करत याला नागडा करून मारा असे म्हणत दगडफेक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.