पुण्यातील हडपसरमधील 7 वाईन शॉपवर गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग आणि मास्कचा वापर केला गेला नाही. त्यामुळे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील सात दारू दुकान वाईन शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या नियम व अटींचे पालन करून वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र रोहित वाइन्स, शनी मंदिराजवळ, एम.आर. वाइन्स, ससाणेनगर, हडपसर, एशिएन वाइन्स, आकाशवाणी, हडपसर, एस. एस. घुले वाइन्स, रासकर चौक, हडपसर, अजंठा वाइन्स, गाडीतळ, हडपसर, राजधानी वाइन्स, हडपसर आणि कुणाल वाइन्स हडपसर या सात वाईन शॉपवर गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस नाईक बेंद्रे आणि करपे यांच्या पथकाने केली.