‘शिवशाही’ बसच्या ड्रायव्हर अन कंडाक्टरनेच पिशवीतून दागिने चोरून नेल्याचा ‘संशय’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – शिवशाई स्लिपर कोचने प्रवास करणार्‍या दिल्लीतील आयटी इंजिनिअर दाम्पत्याच्या दागिन्यांची बॅग रॅकमध्ये ठेवल्यानंतर बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरनेच त्यातून किंमती ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत तसा संशय व्यक्त केले आहे. 8 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 60 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्नाटक पोलीस दलात एएसआय आहेत. त्यांची मुलगी आणि जावई दिल्लीत असतात. ते दिल्लीत आयटी इंजिनिअर आहेत. दरम्यान, दोघे दिल्लीवरून ते कोल्हापूरात कामानिमित्त आले होते. त्यानंतर कोल्हापूरवरून 8 फेब्रुवारी रोजी शिवशाई स्लिपर कोचने रात्री पुण्याला आले. कोल्हापूर ते नाशिक अशी बस होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दागिने त्यांच्या बॅगेत ठेवले व ती बॅग ड्रायव्हरच्या शिट मागिल रॅकमध्ये ठेवली. बसमध्ये केवळ 5 प्रवाशी होते. बस पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आल्यानंतर ते दोघे उतरत होते. त्यांनी बॅगा घेतल्यानंतर त्यांना त्याची चैन उघडी दिसली. त्यामुळे त्यांना साहित्य चोरीला गेल्याचा संशय आला. त्यांनी पाहिले असता त्यातील दागिने व इतर ऐवज असा 59 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यामुळे त्यांनी चालक आणि वाहकाला विचारपूस केली. परंतु, त्या दोघांनही त्यांना खाली उतरून घाईत नाशिकला निघून गेले. पुण्यात ते 4 वाजण्याच्या सुमारास उतरले होते.

पुण्यातून त्यांना 5 वाजता दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे होती. त्यांना जाणे आवश्यक होते. यामुळे त्यांनी घाईत पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानतर त्यांना ऑनलाईन तक्रार दिल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात येतो, असे सांगितले. त्यामुळे ते दिल्लीला गेले. दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली. या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू असतानाच मुलीचे वडिल आणि फिर्यादी हे पुण्यात आले. त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना लेखी तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ड्रायव्हर आणि कंडाक्टरवरच संशय व्यक्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तर, स्वारगेट बस स्थानकातून अनेक प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अद्यापही या घटना थांबलेल्या नाहीत. त्यात हा प्रकार घडल्याने सर्वत्रच खळबळ माजली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. बी. जायभाय हे करत आहेत.