फोनवर तलाक देणार्‍या पतीविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करून तिला फोनवर पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कसबा पेठेत राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती व इतर तीन नातेवाईकाच्या विरोधात मुस्लीम महिला संरक्षण कायद्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विवाहानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच, आरोपीने त्याच्यासोबत कायदेशीर विवाह केला असताना देखील पतीने त्यांना फोनवरून तीन वेळा तलाक-तलाक म्हणून विवाह संपुष्ठात आणला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील या करत आहेत.