Pune Fire | पुण्यात अंत्यसंस्कार करताना उडाला आगीचा भडका; 11 जखमी, माजी महापौर थोडक्यात बचावल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे येथील कैलास स्मशानभूमीत (Kailash Cemetery Pune) अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी मृतदेहावर डिझेल (Diesel) टाकत असताना अचानक हातातून आगीचा (Pune Fire) भडका उडाला. हा भडका इतका जबरदस्त होता की, जे डिझेल टाकत होते त्यांच्या हातातून कॅन उडालाच पण त्याबरोबर आजूबाजूचे 11 जण भाजले (Pune Fire) गेले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून जखमींवर ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचार सुरू आहे. जखमींमध्ये मृतांची आई आणि मामेसासुचा समावेश आहे.

 

आशा प्रकाश कांबळे Asha Prakash Kamble (वय 59, रा. घोरपडी गाव), येणाबाई बाबू गाडे Yenabai Babu Gade (वय 50, रा. घोरपडी गाव), नीलेश विनोद कांबळे Nilesh Vinod Kamble (वय 35), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी Shivaji Baburao Suryavanshi (वय 55, रा. ताडीवाला रोड), वसंत बंडू कांबळे Vasant Bandu Kamble (वय 74, चिंचवड), दिगंबर श्रीरंग पुजारी Digambar Srirang Pujari (वय 40, रा. घोरपडी गाव), हरीश विठ्ठल शिंदे Harish Vitthal Shinde (वय 40, रा. हडपसर), आकाश अशोक कांबळे Akash Ashok Kamble (रा. मुंढवा), शशिकांत कचरू कांबळे Shashikant Kachru Kamble (वय 36, रा. प्रायव्हेट रोड), अनिल बसन्ना शिंदे Anil Basanna Shinde (वय 53, रा. प्रायव्हेट रोड), अनिल नरसिंग घटवळ (रा. ताडीवाला रोड) अशी जखमींची (Pune Fire) नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महात्मा फुले वसाहतीतील 40 वर्षीय दीपक कांबळे यांनी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली होती.
त्यानंतर त्यांच्या मृतदेहावर सायंकाळी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी परिसरातील सुमारे 300 च्या आसपास लोक आले होते.
स्मशानभूमीतील एका कोपऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात येत होते.
शेवटचा अग्नी देण्यासाठी अनिल शिंदे हे डिझेल टाकत होते त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला.
त्यांच्या हातातील कॅन सुटला आणि तो खाली पडताच त्याचाही स्फोट झाला.
त्यामुळे बाजूला उभे असलेले 11 जण भाजले गेले. उपस्थित काही नागरिकांनी जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

 

अंत्यसंस्कारासाठी माजी महापौर रजनी त्रिभुवन (Former Mayor Rajni Tribhuvan) या देखील उपस्थित होत्या.
त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या दुर्घटनेतील अपघातग्रस्त व्यक्तीने त्रिभुवन यांच्या साडीचा आधार घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला असता साडीचा पदर पेटला.
त्यामुळे त्रिभुवन यांचाही हात भाजला गेला. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Fire | 11 injured in cremation at kailas cemetery in pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा