Pune Fire | पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire | पुणे शहरातील गंगाधाम चौकातील (Gangadham Chowk) आई माता मंदिराजवळील श्री जी लॉन्स येथे असलेल्या एका फर्निचरच्या गोडावुनला आज (सोमवार) रात्री 8.42 वाजता लागलेली भीषण आग 10.12 वाजता आटोक्यात आली. एकूण 15 गाड्यांनी आणि 40 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तासभरात आग आटोक्यात आणली. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली. काही मिनीटांमध्येच आगीनं रौद्र रूप धारण केलं. अग्नीशमन दलाचे (pune fire brigade) तब्बल 15 बंब वर्दी मिळाल्यानंतर काही मिनीटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आणि 40 जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या (pune fire brigade) अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसून सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक पोलिस आणि अग्नीशमन (pune fire brigade) दलाकडून आग अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीशमनच्या जवानांकडून आग पुर्णपणे विझविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्यातरी घटनास्थळी 15 बंब आग विझवण्यासाठी कार्यरत होते अशी माहिती अग्नीशमनकडून सांगण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Fire | A huge fire broke out at a furniture godown at Gangadham Chowk in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल यांच्या आई हिरावती यांचा मोठा गौप्यस्फोट; जाणून घ्या आता कोण अडचणीत येणार?

IPL 2022 Team Auction | अहमदाबाद आणि लखनऊ संघ खेळणार आयपीएल, BCCI ला मिळाले 12 हजार कोटी

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 889 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation GB | अनधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय

Pune Crime | विमान तिकीटाचे पैसे मागितल्यास आत्महत्या करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ट्रॅव्हल्स कंपनी मालकाची धमकी