Pune Fire Brigade | Manhole मध्ये कुतुहलमधून वाकून पहायला गेला अन् पडला 15 फुट खोल गटारात; ‘अग्निशमन’च्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire Brigade | रस्त्यावर Manhole चे झाकण चोरट्यांनी चोरुन नेले़ अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यावर बॅरीकेटस टाकलेला तरीही खाली काय आहे, हे पाहण्याच्या कुतुहूलापोटी एक मजूर खाली वाकून पाहू लागला अन पाय घसरुन तो मेन होलमधून थेट 15 फुट खोल जाऊ अडकला अग्निशमन दलाने (Pune Fire Brigade) त्याची काही मिनिटात सुटका केली ही घटना कात्रज चौकाजवळ शनिवारी सकाळी 9 वाजता घडली.

 

 

विजय बेलभादुर (वय ३९, रा. शनीनगर, आंबेगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. विजय हा मोलमजुरी करतो. तो मजूरीसाठी जात असताना खाली काय आहे, हे पहात असताना त्याचा पाय घसरला व तो थेट गटारात कोसळला. तेथून जात असलेल्या कुमार कांबळे यांनी त्याचा आवाज ऐकला. तेव्हा विजय खाली कोसळला असल्याचे लक्षात आले. त्यांनी अग्निशमन दलाला (Pune Fire Brigade) कळविले. अग्निशमन दल, पोलीस तातडीने तेथे पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने फासागाठ करुन काही मिनिटात बाहेर काढले. सिंहगड अग्निशमन केंद्राचे (sinhagad raod fire brigade) तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाकवे, संजू चव्हाण, संदीप पवार, संतोष चौरे यांनी ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Fire Brigade | Leaning curiously into the manhole, he fell into a 15-foot-deep gutter; Firefighters evacuated (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज

UGC NET Exam Date | यूजीसी नेट परीक्षा शेड्यूल बदलले, आता 6 ऑक्टोबरपासून होणार परीक्षा; ‘इथं’ चेक करा

Pune Crime | दरोडा टाकताना तोंडाचा ‘सुटला’ रुमाल अन् आरोपींची पटली ‘ओळख’ अन् पुढं झालं असं काही…