Pune Fire Brigade | अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारोपावेळी जवानांचे संचलन व प्रात्यक्षिके

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Fire Brigade | दिनांक १४ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. मुबंई, डॉकयार्ड येथे जहाजामध्ये लागलेल्या आगीत सन १९४४ मध्ये अग्निशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यानिमित्त देशपातळीवर १४ ते २० एप्रिल जनजागृतीपर अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो.(Pune Fire Brigade)

यानिमित्त पुणे अग्निशमन दलातील अधिकारी व जवानांनी या सप्ताहात शहरातील रुग्णालये, मॉल, शाळा, महाविद्यालये, उंच इमारती तसेच आस्थापना अशा विविध ठिकाणी अग्निविषयक प्रात्यक्षिके तसेच व्याख्याने आयोजित केली होती. आग वा आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे, काय उपाययोजना कराव्यात याबाबत प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले. तसेच सप्ताहामध्ये सारसबाग याठिकाणी जनजागृतीपर अग्निशमन साहित्य व कार्यपद्धती विषयी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला ही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सांगता समारोपावेळी अग्निशमन दलामध्ये गेल्या वर्षभरात ज्या अधिकारी व जवानांनी उत्तम कामगिरी केली अशा एकुण
२३ जणांचा मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सन्मान करत मानचिन्ह व प्रमाणपञ दिले. “माझ्या दलातील प्रत्येक अधिकारी व जवान सक्षमपणे कर्तव्य बजावत असल्याने याचा या दलाचा प्रमुख म्हणून मला अभिमान आहे” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार स्टेशन ड्युटी ऑफिसर गजानन पाथ्रुडकर यांनी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य