Pune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  उरवडे-पिरंगुट एमआयडीसीमधील एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी (SVS Aqua Technology Pune ) या कंपनीला आग (Pune Fire Case ) लागून १७ कामगारांचा मृत्यू (17 workers killed in pune) झाल्याप्रकरणी कंपनी मालकाची न्यायालयाने मंगळवारी (ता. १५) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. निकुंज बिपिन शहा (वय ३९, रा. मयुरेश्‍वर अपार्टमेंट, सहकारनगर) असे कोठडी सुनावलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे (Judicial custody to company owner).

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

सात जून रोजी एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी (SVS Aqua Technology Pune) या कंपनीला आग (Pune Fire Case) लागून त्यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू (17 workers killed in pune) झाला आणि पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी शहा याचा दुबईत असलेला भाऊ केयूर बिपिन शहा (वय ४१) आणि वडील बिपिन जयंतीलाल शहा (वय ६७) यांच्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शहा याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपीच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.
त्यास बचाव पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला.
पोलिसांनी मागितलेली सर्व कागदपत्रे शहा यांनी दिले आहेत.
ते तपासास सहकार्य करीत आहे, असा बचाव ॲड. निंबाळकर यांनी केला.

 

Web Title : Pune Fire Case | Judicial custody to company owner in Urvade fire case; 17 workers were killed

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

LIC New Jeevan Shanti Policy | एकदाच करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर भासणार नाही पैशांची चणचण

कोरोना काळात EPF चे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा