Pune Fire | शिवाजीनगर येथील व्यावसायिक इमारतीला आग, रेकॉर्डरुमधील सर्व कागदपत्र जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) जवळ असलेल्या एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या रेकॉर्डरुमला (Record Room) आग लागली. यामध्ये रेकॉर्डरुममधील सर्व कागदपत्र जळून खाक झाली. बी. यु. भंडारी (B.U. Bhandari) यांच्या वोक्स वॅगन शोरुमच्या (Volkswagen Showroom) समोर ही व्यावसायिक इमारत (Commercial Building) असून आज पहाटे पाचच्या सुमारास ही आग (Pune Fire) लागली. अग्निशमन दलाने (Pune Fire Brigade) तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवली. यामध्ये 25 टक्के महत्त्वाची कागदपत्र (Document) वाचवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

 

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर (Pradeep Khedekar) यांनी सांगितले, शिवाजीनगर येथील महापालिकेच्या जवळ असलेल्या बी. यु. भंडारी यांच्या शोरुम समोर एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यामध्ये असलेल्या रेकॉर्डरुमला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. यामध्ये रेकॉर्डरुमधील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. जयेश शहा (Jayesh Shah) यांच्या मालकीची ही इमारत असून जवळपास तीन हजार स्केअर फुटात ही रेकॉर्डरुम आहे. (Pune Fire)

जयेश शहा यांची विद्युत मोटार कंपनी होती.
मात्र ती बंद झाल्यानंतर या कंपनीची सर्व कागदपत्रे या रेकॉर्डरुमध्ये ठेवण्यात आली होती.
घटनास्थळी पोहचल्यानंतर सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. सर्वप्रथम कसबा फायर स्टेशनची (Kasba Fire Station) गाडी दाखल झाली.
यानंतर नायडू फायर स्टेशनची (Naidu Fire Station) गाडी आली.
आग मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या केंद्रातून एक फायर इंजिन (Fire Engine) आणि दोन टँकर मागवण्यात आले. धूराचे प्रमाण जास्त असल्याने प्रथम सर्व धूर बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर पी. ए .सेट घालून दोन जवानांना आतमध्ये पाठवण्यात आले.
यावेळी पाण्याच्या चार लाईन करुन पाण्याचा फवारा मारण्यात आला. ही आग अर्ध्या तासाने आटोक्यात आली.
आग विझण्यास एक तासाचा कालावधी लागला. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कागदपत्र जळाली होती.

 

Web Title :- Pune Fire | Fire at commercial building in Shivajinagar burn all documents in record room

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा