Pune Fire | पुण्यातील पिसोळी परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘नियंत्रण’

पुणे : Pune Fire | पिसोळी येथील दगडे वस्तीमध्ये एका फर्निचरच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून अजूनही तेथे कुलिंग करण्याचे काम सुरु (Pune Fire) आहे.

पिसोळी येथील दगडे वस्तीत आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. या आगीची घटना समजताच पुणे व पीएमआरडीएच्या (PMRDA) १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. हे गोदाम गोदाम मालकाने दोघांना भाड्याने दिले होते. सुमारे ३५ ते ४० हजार स्क्वेअर फुटाचे त्या गोदामात रात्रीची वेळ असल्याने कोणी नव्हते. गोदामात सर्व लाकडी सामान होते. त्यामुळे आग लागताच तिने संपुर्ण गोदामाला आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या, तोपर्यंत आगीने भीषण स्वरुप धारण केले होते. आगीची तीव्रता इतकी होती की, त्यावर पाण्याचा मारा करण्यासही पुढे जाणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य होत नव्हते.

अग्निशमन दलाचे जवान हे तब्बल तीन तास आगीची (Pune Fire) झुंजत होते. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. अद्यापही तेथे कुलिंगचे काम सुरु आहे. आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

हे देखील वाचा

Ahmednagar Hospital Fire | ठाकरे सरकारकडून अहमदनगर जिल्हा रुग्णालय ‘आग’ प्रकरणी कठोर कारवाई ! सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांच्यासह 2 डॉक्टर, 3 नर्सचा समावेश

Jilha Nivad Samiti Jalna Recruitment | जिल्हा निवड समिती जालना इथे थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Fire | fire at furniture warehouse in Pisoli area of ​​Pune; Control of fire after three hours of efforts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update