Pune Fire | पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील वंडरलँड बिल्डिंगच्या समोरील इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Fire |कॅन्टोमेंट भागात एमजीरोड वंडरलँड बिल्डिंगच्या (MG Road Wonderland Building) समोरील इमारतीचे बेसमेंटमधील साहित्याला आग लागली असल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला आहे. Pune Fire | Fire in the basement of the building in front of the Wonderland building on MG Road in the camp area of Pune

एम.जी.रोड रोडवर वंडरलँड ही प्रसिद्ध इमारत आहे.
त्या इमारती समोरच जुनी एक कॅम्पेलक्स असणारी इमारत आहे.
येथे तळमजला आहे. तर दुकाने आहेत.
या तळ मजल्यावर एक टेलरिंगचे मटेरियल ठेवत असे. साड्या व इतर साहित्य ठेवलेले होते.
दरम्यान आज 4 वाजण्याच्या सुमारास अचानक येथे आग (Fire) लागली.
ही माहिती येथील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
त्यानंतर 4 फायर बंब आणि जवान दाखल झाले.
त्यांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नुकतीच फॅशन स्ट्रीट मार्केटला (Fashion Street Market) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच पण अनेकांचा व्यवसाय देखील ठप्प झाला होता.
त्यामुळे आग लागल्याचे समजताच अग्निशमन दल यांनी तात्काळ धाव घेतली.
यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते.
आग लवकर आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

प्रभारी अधिकारी प्रदीप खेडेकर, केदारी, हनुमंता कोळी, सचिन जवनजाळे, छगन मोरे, प्रताप फणसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.

Web Title : Pune Fire | Fire in the basement of the building in front of the Wonderland building on MG Road in the camp area of Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nana Patole | महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अदानी समूहाच्या निर्णयावरुन पटोलेंचा खणखणीत इशारा

Pune Crime | 3 वर्षाच्या प्रेम संबंधानंतर त्यांच्यात वाद ! प्रेयसीनं 2 मित्रांच्या मदतीने प्रियकराला धु-धु धुतलं अन् लुटलं, कोंढव्यात FIR

Porn Vs Prostitution | राज कुंद्राच्या अटकेनंतर व्हायरल होताहेत त्याची जुनी ट्विट; जाणून घ्या Porn Vs Prostitution बाबत काय म्हटले होते?