Pune Fire | कोंढव्यातील फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire | पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात असलेल्या एका फर्निचर गोदामाला (Furniture Godown) भीषण आग लागली आहे. ही आग आज (मंगळवार) दुपारी लागली असून आगीने (Pune Fire) काही वेळातच रौद्ररुप धारण केले आहे. त्यानंतर ही आग पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) 9 ते 10 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. घटनास्थळी गर्दी न करण्याचे आणि अफांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

अगीच्या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त असून आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

अग्निशमन दलाचे निलेश महाजन (Nilesh Mahajan) यांनी सांगितले की, कोंढवा भागातील पारगे नगर (Parge Nagar) येथील एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागली असून सध्या घटनास्थळी 10 पेक्षा जास्त गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 30-40 अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

 

Web Title :- Pune Fire | huge fire broke out in a furniture warehouse godown in kondhwa of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा