पुण्यातील केमिकल कंपनीला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमाननगरमधील बेकर्स कंपनीत असलेल्या केमिकलला आज सकाळी मोठी आग लागली. त्यात गोदामातील सर्व केमिकल व इतर साहित्य जळून खाक झाले.

कंपनी सकाळी ७ वाजता सुरु होते. त्याच्या अगोदर काही मिनिटे ही आग लागल्याची घटना घडल्याने कामगार कंपनीच्या आत आले नव्हते. त्यामुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही.

विमाननगर येथील बेकर्स कंपनीत प्लेटिंगचे काम चालते. त्यासाठी कंपनीच्या आवारात एका मोठ्या शेडमध्ये प्लेटिंगसाठी लागणाऱ्या केमिकलचा साठा करुन ठेवण्यात आला होता. या साठ्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला ६ वाजून ५६ मिनिटांनी मिळाली. पाठोपाठ येरवडा अग्निशामक दलाचे बंब व वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले.

केमिकलला आग लागली असल्याने जवानांनी फोमचा वापर करुन अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली. या आगीत गोदामातील सर्व केमिकल व इतर साहित्य जळून खाक झाले. आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –