Pune : बुधवार पेठेतील मोबाईलच्या दुकानाला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बुधवार पेठेतील मोबाईलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रात्री घडली. या आगीत दुकान पूर्ण जळून खाक झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झालेली नाही.

बुधवार पेठेतील तापकीर गल्लीत समर्थ प्लाजा ही इमारत आहे. या इमारती दुसऱ्या मजल्यावर समर्थ मोबाईल मार्केट असे दुकान आहे. दुकान बंद असताना रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानातून धूर येत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दल पोलिसांना दिली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते.

जवनांनी प्रथम या इमारतीत राहणाऱ्या जवळपास 500 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दुकानाचे शटर कट केले आणि त्यानंतर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अर्धा ते पाऊण तासानंतर आग आटोक्यात आली. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. आग शॉर्ट सर्किटमुले लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही कारवाई आधिकारी सुनिल नाईकनवरे, जवान आनिल करडेफायरमन जगदाळे, बुंदेले, गायकवाड, कारंडे यांनी केली.