पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील 3 मजली इमारतीमधील रद्दी गोडाऊनला भीषण आग

आगीत तीन मजली इमारतीमधील रद्दी जळाली; ट्रकसह तीन वाहने देखील भस्मात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मार्केटयार्ड परिसरात तीन मजली इमारतीत असणाऱ्या रद्दी कागदाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना रात्री घडली. आग विझविण्यात आली असली तरी अजूनही एका टँकरच्या मदतीने पाणी मारण्यात येत आहे. तीनही मजल्यावरील रद्दी जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

मार्केटयार्ड परिसरात कृषी पणन महामंडळाच्या पाठीमागच्या बाजूला साई मयूर रेडलिंग नावाचा व्यवसाय आहे. ग्राऊंड प्लस दोन मजली इमारत आहे. कागदी पुठ्ठे, रद्दी पेपर आणि इतर रद्दीची या ठिकाणी साठवणूक करण्यात आली होती. समीर निकम यांचा हा व्यवसाय असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. इमारती पूर्ण रद्दीनेच भरली होती. पायऱ्यांवर देखील रद्दी ठेवण्यात आली होती. तर एक ट्रक, पीक आणि आणखी एक वाहने या इमारतीत उभे करण्यात आले होते.

दरम्यान रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती तत्काळ अग्निशमन आणि पोलिसांना देण्यात आली. अग्निशमन दलाची एक गाडी तात्काळ दाखल झाली. मात्र आग तो परियंत मोठ्या प्रमाणात पसरली होती. तर रद्दीचे गोडाऊन असल्याचे लक्षात आल्यानंतर आणखी फायर गाड्या मागवण्यात आल्या. पार्किंगमध्ये देखील रद्दी होती. तर त्याला बाहेरून शटर लावण्यात आले होते. तर पायऱ्यांवर रद्दी ठेवल्याने जवानांना इमारतीत देखील जात येत नव्हते. अग्निशमन दलाने जेसीबी बोलवला. तसेच जेसीबीने शटर तोडण्यात आले.

त्यांनंतर प्रथम ग्राऊंडवरील आग आटोक्यात आण्यात आली. आग इमारतीत उभा केलेल्या महिंद्रा पीकअप, ट्रक आणि आणखी एका वाहनाला देखील लागली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. जवळपास पहाटे परियंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यावेळी आग आटोक्यात आली. आगीचे कारण समजू शकले नाही. पण या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर लॉकडाऊनमुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ऑफिसर सोनवणे, जावन केदारी, घडशी, शेलार, मोरे, मुळीक, शिंदे यांच्यासह एकूण 35 जवानांनी आग आटोक्यात आणली.