Pune Fire | महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन फटून आग, मोठा अनर्थ टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बिबवेवाडी (Bibvewadi Pune) परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील अपर येथील डॉल्फिन चौकात महाराष्ट्र नॅचरल गॅस (Maharashtra Natural Gas) पाईपलाईन फुटून आग (Pune Fire) लागल्याची घटना घडली आहे. डॉल्फिन चौकात (dolphin chowk) बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ड्रेनजची नवीन पाईप लाइन टाकण्याचे काम सुरु असताना गॅस पाईप लाइनला धक्का लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणत आग (Pune Fire) लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

 

विवेकानंद मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईन आहे. या ठिकाणी काम करताना एमनजीलचे अधिकारी, ठेकेदार व महापालिका (Pune Corporation) प्रशासनाचे अधिकारी यांना कोणतीही कल्पना न देता ड्रेनेज पाईप लाईनचे काम (Drainage pipeline work) सुरु होते. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी रस्त्याचे काम सुरु असताना अनेकवेळा गॅस पाईप लाइन फुटण्याचे प्रकार घडले आहेत.

बुधवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या शेजारी चैत्रबन झोपडपट्टी असून मोठी दुर्घटना (Pune Fire) टळली. रात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे गॅस पुरवठा खंडीत करण्यात आला होता, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गॅस पाईप लाइन दुरुस्त करुन गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी महाराष्ट्र नॅचरल गॅसचे अधिकारी कौस्तुभ मिहीर (Kaustubh Mihir) यांनी सांगितले,
की रात्रीच्या वेळी काम सुरु करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली नाही.
विद्युत केबलला धक्का लागल्याने गॅस लाइने पेट घेतला.
अग्निशमन दल व एमनजीलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली.

 

Web Title :- pune fire | maharashtra natural gas pipeline bursts catches fire incident in bibvewadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा

Income Tax Return | भाड्याच्या घरात राहात असतानाही प्राप्तीकरात मिळते सूट; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

Nikki Tamboli | पुढे काय इच्छा आहे निक्की तांबोलीच्या प्रश्नाने चाहत्यांना लावलं वेड, भरभरुन केल्या कमेंट्स

IPL 2022 | मुंबई इंडियन्समधून पांड्या बंधूचा पत्ता कट, तीन खेळाडू करणार रिटेन चौथ्यासोबत बोलणी सुरू

Europe Corona | युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक 73 हजारांहून नवीन कोराना बाधित