Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | नगर रोडवरील (Pune Nagar Road) खराडी (Kharadi) जुना जकात नाका (Kharadi Juna Jakat Naka) उबाळे नगर (Ubale Nagar), महालक्ष्मी लॉन्स (Mahalakshmi Lawns) जवळ असलेल्या जोगेश्वरी मिसळ (Jogeshwari Misal) व त्याच्या बाजूला असलेल्या 12 दुकानांना आज सकाळी भीषण आग लागली. (Pune Fire News)

 

नगर रोडवरील खराडी येथील महालक्ष्मी लॉन्ससमोर जोगेश्वरी मिसळ, ३ फर्निचर, २ मोबाईल शॉपी, हॉटेल एस कुमार अशी एकामेकाला लागून दुकाने, हॉटेल आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली (Pune Fire News). अग्निशामक दल व पीएमआरडीए अग्निशामन दलाचे (PMRDA Brigade Pune) एकूण ६ वाहने आग विझविण्याचे काम करीत असून एक तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे धुराचे लोट हे दूरवरुन दिसून येत आहे. या आगीमुळे नगर रोडवरील वाहतूकही ठप्प झाली आहे.

 

खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर लागलेल्या आगीमध्ये एकूण 12 विविध प्रकारची दुकाने जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी नाही.

 

Web Title :- Pune Fire News | 12 shops including Jogeshwari Misal in Kharadi


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा