×
Homeताज्या बातम्याPune Fire News | पुण्याच्या शिवणेत 15 वाहने पेटविली; जाणीवपूर्वक आग लावल्याचा...

Pune Fire News | पुण्याच्या शिवणेत 15 वाहने पेटविली; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज (Shivkamal Prestige, Shiavane) या इमारतीच्या पार्किंगमधील 13 दुचाकी आणि 2 रिक्षा यांना आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे घडला. अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या बंबांनी (PMRDA) ही आग तातडीने विझवली. मात्र, तोपर्यंत ही 15 वाहने जळून खाक झाली होती. कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. (Pune Fire News)

 

शिवणे येथील शिंदे पुलाजवळ शिवकमल प्रेस्टीज ही 5 मजली इमारत आहे. तिच्या पार्किंगमधील वाहनांना पहाटे 5 वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली. पाठोपाठ अग्निशामक दल व पीएमआरडीएची गाडी घटनास्थळी पोहचली. त्यापर्यंत सर्व वाहने पेटली होती. जवानांनी तातडीने ही आग विझविली. (Pune Fire News)

 

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, इमारतीतील मीटरचे बॉक्स व्यवस्थित होते. फक्त पार्किंगमध्ये लावलेली ट्युब लाईट जळाली. इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, आम्ही आवाज आल्याने खाली आलाे. तेव्हा सर्व वाहने एकाच वेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे त्यांनी सांगितले. उत्तमनगर पोलीस (Uttam Nagar Police Station) घटनास्थळी पोहचले असून ते माहिती घेत आहेत.

 

Web Title :- Pune Fire News | 15 vehicles set on fire in Pune; Citizens suspect deliberate arson

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News