पुण्यातील उंड्रीत गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन टीम – उपनगरातील उंड्री परिसरात असलेल्या एका गाद्या बनविण्याच्या गोदामाला आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यामुळे आगीत गाद्या, लाकडी खुर्च्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने गोदामात कोणीही राहायला नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे.

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीत आज पहाटे 3 वाजून 50 मिनीटांनी गोदामाला भीषण आग लागल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला मिळाला होता. त्यानुसार जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, हॅशवूड या चार गुंठ्यातील गोदामाने आगीचे रौद्र रुप धारण केले होते. गोदाम बंदिस्त असल्यामुळे आग वाढत होती. त्यामुळे अग्निशमक जवानांनी पीएमआरडीए जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. सुमारे एक तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.  आगीत गाद्या, लाकडी पर्निचर,  वायरिंग जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रकाश गोेरे संजय रामटेके केलास शिंदे, नाईकनवरे, रपिक शेख, अर्जुन यादव यांच्यासह 20 जवानांनी प्रयत्न केले.