Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | सासवड – बोपदेव रोडवरील (Saswad – Bopdev Road) येवलेवाडी (Yewalewadi) येथील एका फर्निचरला पहाटे साडेपाच वाजता भीषण आग लागली. आगीत गोडावूनमधील सर्व लाकुड, तसेच फर्निचरचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

 

सासवड – बोपदेव रस्त्यावर एक फर्निचरचे गोडावून आहे. या ठिकाणी काही कामगार झोपलेले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे (Pune Fire News) आग लागली. आगीमुळे कामगारांना जाग आली. तसेच या रस्त्यावरुन जाणार्‍या लोकांनी अग्निशामक दलाला (Pune Fire Brigade) फोन करुन आगीची वर्दी दिली. अग्निशामक दलाच्या ८ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. जळाऊ साहित्य असल्याने आग लगेच भडकली होती. चारही बाजूने पाण्याचा मारा करुन जवानांना २ तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. आगीत गोडावूनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

 

Web Title :- Pune Fire News | a fire broke out at a godown on saswad bopdev road in Yewalewadi of Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा