पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Fire News | कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलला अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील बांबुची सजावट व अन्य साहित्य जळून खाक झाले. (Pune Fire News)
कोरेगाव पार्क येथील लेन नं. ७ मध्ये पब्लिक रेस्टॉरंट (Public Restaurant) आहे. या हॉटेलला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली.
आगीची माहिती अग्निशमन दलाला सकाळी साडेआठ वाजता मिळाली. तातडीने अग्निशमन दलाच्या २ गाड्या व एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहचले. या हॉटेलमध्ये बांबुची सजावट केली होती. त्याला प्रथम आग लागली. आगीची झळ शेजारील बैठकीच्या व्यवस्थेला लागली. तेथे ठेवलेले सोफा, खुर्च्या या आगीत जळून खाक झाल्या. सुदैवाने प्रसंगावधान राखून तेथील गॅस सिलेंडर बाजूला नेल्याने आग भडकली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आगी मागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR
चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)
पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला
मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात