Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 18 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील (MIDC) एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजिस (SVS Aqua Technologies) या रासायनिक कंपनीला (Chemical company) भीषण आग (fire) लागली. ही आग (fire) आज (सोमवार) दुपारी लागली. यामध्ये 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 15 दिवसांपूर्वी देखील याच कंपनीला आग (fire) लागली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,219 नवीन रुग्ण, तर 21,081 जणांना डिस्चार्ज

मिळालेल्या माहितीनुसार, आज या कंपनीत कामावर 41 कामगार हजर होते.
17 कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करत होते.
त्यांची खोली बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.
त्यामुळे या आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या आगीत मंगल नागु आखाडे (खरावडे, महादेवी अंबारे (सोलापूर), सीमा बोराटे (बीड), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), सुरेखा तुपे (करमोळी), संगिता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), सारिका कुदळे यांचा मृत्यू झाला आहे.

जेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध क्रिकेटर, मॉडलसह सोबत ‘या’ आवस्थेत दिसला होता पीटरसन

पहिला दिवस ठरला शेवटचा
मृत महिलांमध्ये मंगल आखाडे यांचा आजचा कामाचा पहिला दिवस होता.
हा पहिलाच दिवस त्यांच्या कामाचा आणि आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.
दरम्यान, कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरु होते.
आग लागल्यानंतर लगेच आगीने रौद्ररूप धारण केले.
ही आग शॉर्टसर्किटमुळं लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र कोरोनाच्या मृत्यू संख्येत जगात 10 व्या क्रमांकावर, भाजपची टीका (व्हिडीओ)

भिंत तोडून कामगारांना काढले बाहेर
आग लागल्यानंतर बघ्यांनी परिसरात एकच गर्दी केली. आग विझवण्यासाठी आणि कामगारांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने भिंत फोडण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पौड पोलीस आणि मुळशीचे तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून कुविख्यात बापु नायरच्या टोळीतील सदस्याला अटक, गुन्हेगाराच्या अंत्ययात्रे दरम्यान काढली होती वाहनांची रॅली

Also Read This : 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय