Pune Fire News | पुण्यातील पिरंगुट एमआयडीसीमधील सॅनिटायजर तयार करणार्‍या कंपनीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यालगतच्या पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत असणार्‍या सॅनिटायजर तयार करणार्‍या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. त्यामध्ये 15 ते 20 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. अग्नीशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह (8 killed) बाहेर काढण्यात आले आहेत.

आग मोठ्या प्रमाणात आहे. महिला कामगार यांचा सहभाग आहे. कंपनीत 15 ते 20 जण आडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह (8 killed) आढळल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

पिरंगुट भागात एस.व्ही.एस. अक्वा टेक्नॉलॉजी ही मोठी  कंपनी आहे.
या कंपनीत सध्या सॅनिटायझर बनवले जात असल्याची माहिती आहे.
आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या कंपनीत आग (Fire company) लागली.
हा प्रकार समोर येताच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
त्यानुसार दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून आता कुलिंगचं काम सुरू आहे.

घटनास्थळी पोलीस  दाखल झाले असून येथे खबरदारी म्हणून रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या आहेत.
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे.
आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार,

Web Title : Pune Fire News | A fire broke out at a sanitizer manufacturing company at Pirangut MIDC in Pune; 8 killed