Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरीमध्ये गोदामाला भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) परिसरात असलेल्या एका गोदामाला (Warehouse) आग लागल्याची घटना घडली आहे. गोदामाला लागलेल्या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक (Pune Fire News) वृत्त आहे. मात्र, या आगीनंतर सिलेंडरचे स्फोट (Cylinder Explosion) झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरातील सोपान नगरमध्ये ही घटना (Pune Fire News) घडली आहे. सोपान नगरमधील एका गोडाऊनला आग लागली आहे. हे स्क्रॅप गोडाऊन आहे.

या ठिकाणी तीन कुटुंब राहत होती. अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी त्यांना सुखरुप  बाहेर काढले. स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये सिलेंडर होते. एकापाठोपाठ अनेक सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने वेळीच सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून 5 वाहने, पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानातील भंगार जळून खाक झाले आहे.
तब्बल दोन तासानंतर अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आग लागलेल्या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता.

Web Title :-  Pune Fire News | a fire broke out at vadgaon sherry godown in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

MNS | ’50 खोके सामाना ‘OK’, शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला