Pune Fire News | महंमदवाडी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर भीषण आग

Pune Fire News | A massive fire broke out on the 11th floor of a building in Mahamadwadi

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | कोंढवा महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूल (Delhi Public School Mahamadwadi Kondhwa) जवळ एका 11 मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील एका सदनिकेत मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) अग्निशमन वाहने आणि उंच शिडीचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन वीस मिनीटात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजले नाही. या इमारतीत असणारी स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत होती. (Pune Fire News)

अग्निशमन जवानांनी (1104 नंबर सदनिका) धुरामुळे प्रथम गच्चीवर असलेल्या सुमारे सहा रहिवाशांना (०४ महिला ०२ पुरुष) बी ए सेट परिधान करत सुखरुप ठिकाणी हलविले. आणि पाण्याचा मारा सुरु केला. तसेच आग इमारतीत इतरत्र पोहोचणार नाही याची खबरदारी घेतल्याने मोठा धोका टळला. तसेच वेळीच दलाची मदत पोहोचल्याने आगीवर वेळेत नियंत्रण मिळवणे शक्य झाले. सुमारे वीस मिनिटात जवानांनी आग नियंत्रणात आणत कुलिंग सुरू ठेवले. सदर सदनिकेमधील सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सदनिकेत आग लागली त्यावेळी चार रहिवाशी होते. ते सर्वजण सुखरुप आहेत. सदर इमारतीत असणारी स्थायी अग्निशमन यंञणा बंद अवस्थेत होती.

या ठिकाणी आग मोठ्या स्वरूपात असल्याने 8 अग्निशमन वाहनांन सोबतच उंच शिडीचे वाहन व बीए सेट व्हॅन
रवाना करण्यात आले. जवानांनी वेळेत आग विझवत मोठा धोका टाळला, त्या बाबत नागरिकांनी आभार मानले.
अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, समीर शेख, प्रमोद सोनावणे,
पंकज जगताप, राजेश जगताप, सुभाष जाधव, व इतर सुमारे 30 जवानांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठा भाऊ, वहिनीच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !

तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, नराधमास अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी

व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्‍या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक

Total
0
Shares
Related Posts