Pune Fire News | हडपसरमधील भाजीमंडईला मध्यरात्री भीषण आग, भाजी विक्रिचे 90 स्टॉल दोन टॅम्पो जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे असणाऱ्या भाजी मंडईमध्ये (Vegetable Market) भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची वर्दि अग्निशमन दलाकडे येताच काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र (Kaleborate City Fire Station), हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकुण तीन अग्निशमन वाहने (Pune Fire Brigade) रवाना करण्यात आली होती. ही आग (Pune Fire News) सोमवारी (दि.20) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास लागली.

घटनास्थळी पोहोचताच जवानांना भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे (Pune Fire News) निदर्शनास आले. जवानांनी तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याठिकाणी कोणी इसम नसल्याची खात्री केली. जवानांनी 25 मिनिटात आग पुर्ण आटोक्यात आणत कुलिंग करुन आग पुर्ण विझवत धोका दूर केला.

त्याठिकाणी छोटे भाजी विक्रीकरिता असणारे अंदाजे 90 स्टॉल असून जवळपास सर्व स्टॉलचे आणि त्यामध्ये
असणाऱ्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच तिथे असणारे दोन टेम्पो ही जळाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर,
चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.

Web Title :- Pune Fire News | big fire at vegetable market in hadapsar at midnight 90 stalls of vegetable sellers burnt down

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; आलिया ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

MPSC Students Protest in Pune | आवश्यकता पडल्यास कोर्टात जाऊ, देवेंद्र फडणवीसांचे MPSC विद्यार्थ्यांना आश्वासन

Nashik Crime News | आई-बाबांना शेतात मदत करायला गेली असताना 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू