Pune Fire News | कोंढव्यातील क्लिनिकला आग, कोणीही जखमी नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | कोंढवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील (Dr. Babasaheb Ambedkar Chowk,Kondhwa) एका क्लिनिकला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने तेथे पोहचून काही वेळातच ही आग विझविली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

कोंढव्यातील धन्वंतरी क्लिनिकला (Dhanvantari Clinic) आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला
(Pune Fire Brigade) पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाची गाडी तातडीने
(Pune Fire News) घटनास्थळी पोहोचली. तेथे  बंद असलेल्या क्लिनिकला आग लागली होती.
पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना आग इतरत्र पसरु दिली नाही.
सुमारे 10 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत क्लिनिकमधील संपूर्ण फर्निचर,
इलेक्ट्रीक वायरिंग, मेडिसिन व कागदपत्रे जळून मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कारवाईत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रामधील (Kondhwa Budruk Fire Station) जवान योगेश पिसाळ,
किशोर मोहिते, रफिक शेख, मदतनीस प्रथमेश निकम, वाहनचालक रवींद्र हिवरकर यांनी भाग घेतला.

Web Title :- Pune Fire News | Fire at clinic in Kondhwa, no one injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | दिवाळीनंतर सोने तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Gautami Patil | सांगलीत झालेल्या घटनेनंतर गौतमी पाटीलनी पत्रकार परिषद घेत केला ‘हा’ मोठा खुलासा (VIDEO)