Pune Fire News | टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; पाच तासानंतरही आग भडकलेलीच : १० सिलेंडर बाहेर काढल्याने आणखी मोठा अनर्थ टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | टिंबर मार्केटमधील (Timber Market, Bhawani Peth) लाकडांच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली असून त्यात शेजारील चार घरे या आगीत जळून खाक झाली आहेत. पहाटे चार वाजता लागलेली ही आग सकाळी ९ वाजले तरी धुमसत होती. (Pune Fire News)

 

भवानी पेठेत टिबर मार्केटमध्ये एकाला एक लागून लाकडाची गोदामे आहेत. त्यातील एका गोदामाला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीची खबर पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी अग्निशमन दलाला (Fire Brigade) मिळाली. दाट वस्ती आणि लाकडाच्या गोदामाला लागलेली आग लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रातील गाड्यांसह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे (Fire Officer Devendra Potphode) यांच्यासह ३० अधिकारी व १०० जवान तसेच पुणे कॅन्टोंमेंट, पीएमआरडीए अग्निशम दलाची (PMRDA Fire Brigade) एकूण १८ वाहने, टँकर घटनास्थळी पोहचली. त्यांनी सर्व प्रथम शेजारील वस्तीमध्ये व शाळेमध्ये आग पसरु नये, यासाठी पाण्याचा मारा आगीच्या चारही बाजूने कडेला करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुसर्‍या पथकाने या ठिकाणी असलेले १० सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा धोका टळला. (Pune Fire News)

या आगीमध्ये ८ गोदामातील संपूर्ण लाकडी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत शेजारील शाळेमधील ८ वर्ग जळून खाक झाले आहेत. त्यात शिक्षकांच्या खोलीचाही समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान सातत्याने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, लाकडाच्या एकावर एक लागलेल्या थप्प्या असल्याने आग विझविली तरी त्यामधील निखारे काही वेळाने पुन्हा पेट घेत होते. त्यातून पुन्हा पुन्हा आग भडकताना दिसून येत होती. सकाळी ९ वाजून गेल्यानंतरही ही आग अद्याप सुरु होती. या आगीत कोट्यवधींचे साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. आग कशी लागली, हे अद्याप समोर आले नाही.

 

 

Web Title :  Pune Fire News | Fire breaks out at timber warehouse in Timber Market; Even after five hours,
the fire still raged: 10 cylinders were pulled out and a bigger disaster was averted

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा