पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रेंजहिल्स रस्त्यावरील (Range Hills Road Pune) अशोक नगर भागात गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका मेडिकल दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील औषधांच्या बाटल्यांसह सर्व साहित्य जळाले. दुकान बंद असल्याने सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या आगीची (Pune Fire News) झळ शेजारी असणाऱ्या इतर दोन दुकानांना बसली.
अशोक नगर भागात मेडीक्युअर मेडिकल स्टोअर्स आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास या दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या औंध केंद्रातील अधिकारी शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी जाईपर्यंत आग भडकली होती.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पिंपरी : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाचा मृत्यू