Pune Fire News | सुरक्षा डोअर गोदामाला भीषण आग; लोणी काळभोरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Fire News | पुणे -सोलापूर रोडवरील (Pune-Solapur Road) लोणी काळभोर येथील बोरकर वस्तीमध्ये असलेल्या सुरक्षा डोअर (Security Door) या लाकडी सामान असलेल्या गोडावूनला पहाटे भीषण आग (Pune Fire News) लागली. या आगीत गोदामातील सर्व सामान जळून खाक झाले. आग लागली तेव्हा तेथे कोणीही नसल्याने दुर्घटना टळली.

लोणी काळभोर मधील बोरकर वस्तीमध्ये सुरक्षा डोअर हे घरांसाठी सेफ्टी डोअर बनविणार्‍या कंपनीचे गोडावून आहे.
गोडावून बंद असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोडावूनमधून धूर येत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहून अग्निशमन दलाला (Fire Brigade) कळविले. गोडावूनच्या मागच्या बाजूला आग लागली होती. पुणे अग्निशमन दल व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या (PMRDA Fire Brigade) ३ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी गोडावूनच्या मागील भागाचे पत्रे उचकटले, खिडकीतून पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आज विझविण्यात यश आले. (Pune Fire News)

गोडावूनमधील तयार साहित्य तसेच कंटिंग मशीन व अन्य यंत्रसाम्रुगी या आगीत जळून खाक झाली.
गोडावून बंद असल्याने नेमकी आग कशी लागली याचे कारण समोर येऊ शकले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Recruitment | 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune PMC News | टँकरने होणारी पाण्याची ‘चोरी’, ‘धंदा’ आणि ‘गळती’ला महापालिकेचा लगाम ! रामटेकडी आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्राचे ‘ऍटोमायझेशन’ सुरू