पुण्यातील बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 कामगार जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार कामगार भाजल्याची घटना घडली. काही वेळा पूर्वी हा प्रकार घडला आहे. चतुशृंगी पोलिसांनी जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

बालेवाडी परिसरात हाय स्ट्रीट होटेल हॅपी द हार्ट हे हॉटेल आहे. हॉटेल बंद होते.मात्र आत कामगार होते. नेमके ते आत काय करत होते, याची माहिती मिळू शकलेली नाही.

हॉटेलात जेवण बनविण्यासाठी सिलेंडर होते. दरम्यान 8 वाजण्याच्या सुमारास अचानक होटेलमधील सिलेंडरचा मोठा स्पोट झाला. यावेळी हॉटेलात असणारे चार कामगार भाजले गेले आहेत. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या आगीत 4 कामगार जखमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान त्यांची नावे अद्याप समजली नाहीत. हे हॉटेल कोणाचे आहे. तसेच कामगार नेमके हॉटेलात काय करत होते याची माहिती पोलीस घेत आहेत.