Pune Fire News | औंधमधील सानेवाडीतील आय टी पार्कमधील इमारतीला भीषण आग; इमारतीतील फायर सिस्टिम होती बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | औंध येथील सानेवाडीत (Sanewadi, Aundh) असलेल्या आय टी पार्कमधील (IT Park) इमारतीच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे भीषण आग (Pune Fire News) लागली. त्यात या हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

 

मोठ्या इमारतीला परवाना देताना तेथे फायर सिस्टिम (Fire System) उभारणे व त्याची अग्निशामक दलाकडून (Fire Brigade) ना हरकत प्रमाणपत्र घेणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. मात्र, अनेक व्यावसायिक इमारतींमध्ये अशी फायर सिस्टिम उभारली जाते. त्यानंतर ती दुर्घटनेच्यावेळी उपयोगी यावी, यासाठी कायम सुरु राहील, याची कोणतीही काळजी घेतली जात नाही. औंधमधील सानेवाडी येथील गायकवाड आय टी पार्क येथील एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी आग (Pune Fire News) लागल्याची खबर अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या.

गायकवाड आय टी पार्कमधील (Gaikwad IT Park) ही इमारत ७ मजली असून तिच्या ८ व्या मजल्यावर टेरेसवर हॉटेल (Hotel) आहे. इमारतीच्या तळमजल्यावर एक शोरुम असून ६ मजल्यावर ऑफिसेस आहेत. हॉटेलचे कर्मचारी मध्यरात्री साडेबारा वाजता हॉटेल बंद करुन गेले होते. इमारतीतील फायर सिस्टिम बंद होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना उंचावर लाईन ओढत न्यावी लागली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग (Pune Fire News) विझविण्यात यश आले.

 

याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी मेमाणे (Shivaji Memane) यांनी सांगितले की,
टेरेसवरील हे हॉटेल सुमारे ६ हजार स्क्वेअर फुटाचे असून लोखंडी अ‍ॅगलने शेड तयार करण्यात आली होती.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीत बार काऊंटर, टेबल, खुर्च्या व इतर फर्निचर जळून खाक झाले.
इमारतीतील फायर सिस्टिम बंद होती. त्यामुळे जवानांना लांबवर लाईन ओढत नेऊन आग विझवावी लागली.

 

Web Title :- Pune Fire News | Massive fire at IT Park building at Sanewadi in Aundh; The fire system in the building was off

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा