Pune Fire News | चांदणी चौकात ‘पीएमटी’ बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केट यार्ड मधून मारणेवाडीसाठी रात्री साडेआठ वाजता सुटलेल्या बसने चांदणी चौकात पेट (Pune Fire News) घेतला. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसला आग लागली त्यावेळी 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. ही बस पिरंगुटच्या दिशेने जात होती. त्यावेळी चांदणी चौकात आल्यावर बावधन गावच्या हद्दीत बसच्या इंजिनने पेट (Pune Fire News) घेतला.

 

चांदणी चौक परिसरात बस पोहोचल्यानंतर बसच्या इंजिनला अचानक आग लागली. ही गोष्ट चालक विक्रम सिंह गरुड यांच्या लक्षात आली आणि त्यांनी बस बाजूला घेतली. तसेच कंटक्टर अभिजीत साबळे यांना सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. बसमध्ये 35 ते 40 प्रवाशांसह दोन पत्रकार होते. त्यातील एका पत्रकाराने ही माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापनाला दिली. (Pune Fire News)

 

त्यानंतर तहशीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बलकवडे आणि टीम घटनास्थळी पोहोचली.
कोथरुड आणि वारजे अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले.
यावेळी बावधन पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक एस.आय. साळूंके, पोलीस हवालदार विजय गायकवाड,
व्हायाळ, सुनील जाधव, वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जमलेल्या लोकांना आणि प्रवाशांना घटनास्थळापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न केले.

 

Web Title :- Pune Fire News | pmt bus burnt down in chandni chowk pune passengers safe due to driver s intervention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh On Sushma Andhare | ‘आमची नावे घेऊन सुषमा अंधारेंचे दुकान चालू आहे’ – चित्रा वाघ

Anshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट

Sunny Waghchoure-Golden Boy | बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनला टक्कर देण्यासाठी पुण्याचा गोल्डन बॉय घेणार एंट्री