Pune Fire News | पुणे : माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट, दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

Pune Fire News | Pune: A cylinder caught fire in Mauli's palkhi, the fire was brought under control by the army personnel on time

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | आज (गुरुवार) सकाळी सुमारे दहा वाजता सासवड – जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचले. जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये कोणी जखमी झाले नाही.

(Pune Fire News) पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्त करिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले.या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunil Kedar Plea Rejected In High Court | हायकोर्टाने सुनील केदार यांची याचिका फेटाळल्याने राजकीय भवितव्य टांगणीला

Pune Porsche Car Accident Case | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : जिल्हा न्यायालयाच्या निकाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार – ॲड. मिलिंद पवार

Ganesh Satav Birthday | युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक (Video)

Sanjay Raut On Ajit Pawar | “अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला”; संजय राऊतांचा निशाणा

Food Service Market | 6 वर्षात फूड सर्व्हिस मार्केटमध्ये येईल दुप्पट उसळी, भारतात ट्रेंड करतेय हे मार्केट

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)