Pune Fire News | पुण्यातील एका कंपनीला भीषण आग, ‘स्फोटा’मुळं भीतीचं वातावरण; अग्नीशमनचे 8 बंब घटनास्थळी दाखल (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Fire News | शहरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (bhau industrial estate sinhagad road nanded phata) एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग (Pune Fire News) लागली आहे. कंपनीत सलग स्फोट होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पुणे व पीएमआरडीए अग्नीशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

 

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. सिलेंडर स्फोटासारखे आवाज होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या बाहेर बघ्यांनी देखील मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. अग्नीशमन दलाकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. कंपनीत काही प्रमाणात केमिकल असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सर्वच यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.

Web Title : Pune Fire News | Terrible fire at a company in Pune, atmosphere of fear due to ‘explosion’; Firefighters arrive at 8 bomb scene (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update