Pune Fire News | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 17 सिटर मिनीबसला लागलेल्या आगीत बस जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनीबसने (MH 12 NX 5489) पुण्यातील (Pune Fire News) मुळशी तालुक्यातील भुगाव जवळ अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत मिनीबस जळून (Pune Fire News) खाक झाली आहे. सुदैवाने या गाडीतून प्रवास करणारे सर्व वऱ्हाडी बचावले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या दोन अग्निशमन दलाचे (fire brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा फवारा मारुन आग विझवली.

 

17 सिटर मिनीबसने हे वऱ्हाडी पिरंगुट कडून हडपसरला (Hadapsar) निघाले होते, अशी माहिती गाडीचे मालक सागर भाग्यवान कवडे Sagar Bhagyaan Kavade (वय-33 रा. धायरी फाटा) यांनी दिली. आग लागली त्यावेळी बसमध्ये 12 लोक प्रवास करत होते. या गाडीत घरगुती वापराचा गॅस सिलेंडर (Gas cylinder) होता. गाडीच्या रेडिएटर जवळून धूर यायला लागल्यानंतर चालकाने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणात या गाडीने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, पिरंगुटकडून येणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात (Pune Fire News) आली होती.

 

ही मिनीबस गाडी मालक यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत होती. मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने ही गाडी एकाच जागेवर उभी होती. यामुळे गाडीत बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले नसल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Fire News)

 

Web Title :- Pune Fire News | The 17-seater minibus carrying the bride and groom caught fire in the blaze

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची…’; संजय राऊतांचा सूचक इशारा

Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस