पुण्यातील लोहगाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील लोहगाव भागात एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली. आगीची तीव्रता मोठी असून, आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत. लोहगाव येथील वाघोली रस्तावर संतनगर येथे फर्निचरचे दुकान आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धूर येत असल्याचे दिसून आले.

नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन आणि पोलीस दलाला दिली. त्यानुसार येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तर विमानतळ पोलिसांनी येथे येऊन जमलेल्या गर्दी कमी केली. दरम्यान फर्निचरचे दुकान असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेठ घेतला होता.

जवानाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात येत आहे. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याचे आणखी बंब मागवण्यात आले असून, 3 फायर बंबच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली जात आहे. आग नेमकी का लागली हे समजू शकले नाही.