Pune Fire | पुण्यात आग्नितांडव! तीन दुकाने जळून खाक; समोर आले आग लागण्याचे कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Fire | पुण्यातील स्वारगेट (Swargate Fire Incident) परिसरात दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात भंगाराचे दुकान, गादी घर आणि रद्दी डेपो ही दुकाने जळूण खाक झाली आहेत. दुकानामध्ये काम सुरू असताना ही आग लागली होती. अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. (Pune Fire)

दुकानात काम सुरू असताना गॅस कटरची ठिणगी पडून दुकानात आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून, तीन्ही दुकाने मात्र जळून खाक झाली आहेत.

ही आग (Pune Fire) ठिणगी पडून लागल्यानंतर बघता बघता शेजारच्या रद्दी आणि भंगाराच्या दुकानात पसरली आणि गादीच्या दुकानाबरोबरच रद्दी आणि भंगारचे दुकान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आले.
स्वारगेट हा पुण्यातील मोठा वर्दळीचा भाग मानला जातो.
त्यामुळे तात्काळ अग्निशामक विभागाला या आगीबाबत कळविण्यात आले.
अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकाने पूर्ण जळून खाक झाली आहेत.
तसेच या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title :- Pune Fire | severe fire broke out in pune three shops were gutted in the fire

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबेंना नाही तर ‘या’ उमेदवाराला?; एका नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधान…

Maharashtra Police | पोलीस दलातील ‘बँड्समन’ची पदं कधी भरणार?, DGP आणि गृह विभागाला म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश