मध्यरात्री बर्थडेचा धिंगाणा, पुण्यात फटाके वाजविणाऱ्या बर्थडे बॉयला दंड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वाढदिवस मध्यरात्री साजरा करण्याची मोठी क्रेझ सध्या आहे. परंतु मध्यरात्री फटाके फोडणे आणि नागरिकांची झोप खराब करणे मोशीतील एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकऱणी ताब्यात घेतलेल्या तरुणाला न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.सागर बाळशीराम पराड (वय २०, रा. द्वारका सोसायटी, मोशी ) असे तरुणाचे नाव आहे.

१ जून रोजी सागरचा वाढदिवस होता. त्यावेळी मध्यरात्री तो मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होता. यावेळी त्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्याने मोठ्या जल्लोषात फटाके फोडले. मात्र या फटाक्यांच्या आवाजाचा शेजाऱ्यांना त्रास झाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.