PUNE : देहूरोड येथील भाजप नगरसेवकावर गोळीबार ; परिसरात प्रचंड खळबळ

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञताकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देहूरोड परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये खंडेलवाल भयभीत झाले आहेत.

भयभीत खंडेलवाल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज (गुरुवार) सांयकाळी घडला आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु केले आहे.

खंडेलवाल यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना घटनेची माहिती देण्यात आली असुन ते देखील घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.

टीप :- अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, खंडेलवाल यांना गोळी लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सविस्तर वृत्‍त थोळयाच वेळात

आरोग्य विषयक वृत्त-
रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल
हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार
एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

Loading...
You might also like