10 वर्षापासून चालू असलेल्या वादातून नगर रस्त्यावर गोळीबार, तिघे ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नगर रस्त्यावरील खांदवेनगरमध्ये झालेल्य गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान गेल्या दहा वर्षांपूर्वीपासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. दोन गोळ्या झाडल्या असून, एक गोळी डोक्याला चाटून (घासली) आहे.

मधुकर दत्तात्रय खांदवे (वय 54, रा. खांडवेनगर, लिहगाव, विमानतळ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजात बाळासाहेब शेजवळ, सूरज शेजवळ व इतर एकाला ताब्यात घेतले आहे. तर एकाचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे व आरोपीमध्ये रस्त्यावरून गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहेत.

प्लॉटमधून वहिवाट रस्ता आहे. त्यावरून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत तहसीलदार आणि प्रांत हवेली यांच्याकडे तक्रारी दाखल आहेत. दरम्यान यातील फिर्यादी यांच्या पत्नीने या कारणावरून आरोपी अभिजित याच्या भावाला 10 वर्षांपूर्वी मारहाण केली होती. त्यांनंतर त्याने आत्महत्या केली होती. त्याने यांच्यामुळेच आत्महत्या केल्याची भावना आरोपींच्या मनात आहे.

तर रस्त्यावरून असणारे वाद देखील अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे शेजवळ आणि खांदवे यांच्यात वाद सुरू आहेत. दरम्यान, अभिजित आणि त्याचे तर तीन साथीदार बुधवारी रात्री येथे आले. यावेळो आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 2 गोळ्या त्यांच्या दिशेने झाडल्या आहेत. यातील एक गोळी मधुकर यांच्या डोक्याला लागून गेली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.